पीक विमा भरण्यास आता तीन दिवसांची मुदतवाढ, देण्यात आली PMFBY crop insurance date extended


पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता शेतकऱ्याना ५ डिसेंबर पर्यंत पीक विमा भरता येणार
PMFBY crop insurance date extended

Pikvima, Rabbi pikvima arj



 


PMFBY crop insurance date extended



 पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ४ व ५ डिसेंबर रोजी पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

 


प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 3० नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती.


आजपर्यंत राज्यात लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 



https://www.amazon.in/dp/B0BX75F1TQ?ref=ppx_pop_mob_ap_share

त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे 

 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने