माझी लाडकी बहिन योजना नेमकी काय आहे कोणाला घेता येणार 18000₹ चा लाभ
महिला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उपक्रम संधी उपलब्ध होण्यासाठी सरकारकडून विविध धोरणे, कार्यक्रमाने योजना राबवल्या जातात राज्य शासनाने 7 मार्च रोजी राज्याचे चौथे महिला धोरण ही जाहीर केली आहे त्याचप्रमाणे नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक पाहणी अहवाला दरम्यान राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांना केंद्रा त ठेवून ते महत्त्वकांक्षी योजना जाहीर केल्या त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही जाहीर केली.
मुलीला सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रामध्ये समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यासाठी पोषण आहार, उद्योजकता, शिक्षण, तसेच कौशल्य विकास आणि विविध योजनेची घोषणा करीत अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध योजना महिलांसाठी लागू केल्या. त्यात म्हणजे महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याची घोषणा केली .
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे आणि ही पैसे महिलांच्या खात्यामध्ये DBT च्या माध्यमातून जमा केले जाणार आहे . आणि ह्या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. राज्य शासनाला या योजनेचा 46 हजार कोटीचा आर्थिक भार पडणार आहे
योजेअंतर्गत लाभार्थी पात्रता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील महिलांना घेता येणार
योजनेचा लाभ 21 ते 65 वर्षातील महिलांना घेता येणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभ घेण्याकरिता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न .2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
इन्कम टॅक्स भरणारे महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही
सरकारी नोकरी करणारी महिला पण या या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागपत्रे लागतील
आधार कार्ड
बैंक पासबुक
फोटो
अधिवास प्रमाणपत्र जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड ( कोणतेही एक )
हमीपत्र
तुम्ही तयार केलेली USER ID PASSWORD इंटर करून लॉगिन करून घ्यावे
लॉगिन केल्यानंतर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana ऑप्शनवर क्लिक घ्यायचे आहे.
आता तुम्हाला Aadhar No इंटर करून Send OTP ह्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे .
आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर वर OTP येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्यावे.
OTP वेरिफाय झाल्या नंतर तुमच्या समोर योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये काही प्रमाणात आधार प्रमाणे माहिती तुम्हाला दिसेल.
Majhi Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Process
अर्जामध्ये मागितलेली उर्वरित सर्व माहिती अचूकपणे भरून घ्यावी
अर्जाच्या शेवटी तुम्हाला अर्जदार महिलेचा फोटो व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
अर्जात दिलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे चेक करून अर्ज सबमिट करून घ्यायचा आहे .
अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसाठी Majhi Ladki Bahin Yojana Official Website Portal च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

