Pik Vima List 2023 Maharashtra महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यात यावर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने अनेक जिल्ह्यांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आता दुष्काळ परिस्थिती असलेल्या मंडळाना पिक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत.याआधीच बीड,लातूर या जिल्ह्यांना सरसकट पीकविमा मंजूर करण्यात आला असून १३ जिल्ह्यामध्ये पाऊस कमी असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे कोणते जिल्हे व सविस्तर माहिती पाहूया.
महाराष्ट्र राज्याचे जवळपास ६५-70 टक्के उत्पन्न हे शेतीशी निगडीत असते त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा शेती हाच व्यवसाय राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.राज्यात यावर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस अनेक जिल्ह्यात झालेला नसल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून नुकतेच समोर आले आहे.
पुणे हवामान विभागाचे हवामान तज्ञ डॉ.सखा सानप यांनी नुकतेच राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असल्याचे सांगितले आहे.राज्यातील कोकणाचा काही भाग,ठाणे आणि नांदेड हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यंत कमी असल्याचे सांगितले आहे.सरासरीपेक्षा मागील वर्षाच्या पावसाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी ते अत्यंत कमी प्रमाणावर असल्याची माहिती देण्यात आली आहे.यामध्ये कोणत्या १३ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर होणार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.