नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता जमा

 

Pm_kisan


नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता जमा 


Namo Shetkari Yojana

 



राज्यातील तब्बल ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता गुरुवार दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी दिला जाणार आहे.याबाबत आता अधिकृत माहिती देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व राज्यातील सर्व मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना हा हफ्ता दिला जाणार आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची असणारी योजना म्हणजेच नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेचा आता पहिला हफ्ता २००० रु.शेतकऱ्यांच्या खात्यावर दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी जमा केला जाणार आहे.या योजनेच्या पहिल्या हफ्त्यासाठी १७२० कोटी रु.निधी वितरीत करण्यात आला आहे.राज्यात ओढविलेल्या दुष्काळ परिस्थितीला तोंड देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सनासुदीत आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हफ्ता हा राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रु.प्रमाणे दिला जाणार आहे.

 

पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे ज्या बँक खात्यात जमा होतात त्याच बँक खात्यात तुमचे नमो शेतकरी योजनेचे सर्व हफ्ते जमा होणार आहेत.


Namo Shetkari Yojana

यासाठी तुम्ही पीएम किसान सन्मान योजनेच्या ekyc करण्यासाठी जे बँक खाते दिले होते तेच बँक खाते तुमच्या आधार कार्ड ला लिंक झालेले असून तुमचे पुढील सर्व पीएम किसान योजनेचे हफ्ते आणि नमो शेतकरी योजनेचे देखील सर्व हफ्ते त्याच बँक खात्यात जमा होणार आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने