टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचे भावही भडकणार !

 टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचे भावही भडकणार !



 


टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचे भावही भडकणार !
॥ प्रतिकिलो ६० ते ७० रुपयांवर जाण्याचा अंदाज कांद्याचे लागवडक्षेत्र


मुंबई : देशभरात 1 टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. कुठे १२० रुपये, तर कुठे २०० रुपये किलोने टोमॅटोची विक्री केली जात आहे. अलीकडच्या काही दिवसांत काही ठिकाणी टोमॅटोच्या दराने दिलासा मिळतो नू मिळतो तोच आता कांद्याचे भाव भडकण्याची शक्यता आहे. कांदा सध्या अंदाजे २८ ते ३२ रुपये किलोच्या आसपास रेंगाळत आहे. ऑगस्टअखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात विक्रमी वाढ होऊन तो प्रतिकिलो ६० ते ७० रुपयांवर जाण्याचा अंदाज क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्सच्या अहवालात व्यक्त

 

करण्यात आला आहे. मागणी-पुरवठ्यातील तफावतीचा परिणाम ऑगस्टच्या अखेरीस कांद्याच्या किमतीवर दिसून येण्याची शक्यता आहे. परिणामी सप्टेंबरच्या सुरुवातीपासून किरकोळ बाजारातील किमती ६० ते ७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतात. पण या किमती २०२० 

मधील कमाल पातळीच्या खाली  असतील, असे या अहवालामध्ये म्हटले आहे. रब्बी हंगामातील कांद्याची साठवणूक आणि खप याचा दोन महिन्यांनी कमी झालेला कालावधी. त्याचप्रमाणे फेब्रुवारी- मार्चमध्ये घबराटीतून झालेली विक्री यामुळे खुल्या बाजारात रब्बीचा साठा सप्टेंबरऐवजी ऑगस्टच्या अखेरीस 


कांद्याचे लागवडक्षेत्र


८ टक्क्यांनी कमी


यावर्षी जानेवारी- मेदरम्यान कांद्याचे दर घसरल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र यामुळे खरीप हंगामात कांदा लागवडीपासून शेतक परावृत झाले. त्यामुळे कांद्याची कमी लागवड झाली. याचा परिणाम म्हण यंदा कांदा लागवडीखालील क्षेत्र ८ टक्क्यांनी घटणार असून, कांद्याचे खरीप उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत ५


लक्षणीयरीत्या घसरण्याची भीती आहे. त्यामुळे कांद्याचा खप वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरपासून खरीपाची आवक सुरू झाल्यानंतर कांद्याचा पुरवठा अधिक सुरळीत होऊन भाव कमी होतील, असा अंदाज अहवालामध्ये व्यक्त  करण्यात आला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने