Sheti Tar Kumpan Yojana कुंपन अनुदान योजना सुरू
जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपन लावावे लागते. परंतू कुंपन लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपन अनुदान योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेवू शकतात. तार कुंपन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येतो, शेतकऱ्यांना अर्ज कुठे करावा लागतो. त्यासोबत अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. योजना राबविण्याचा मुख्य उद्देश काय, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया…
तार बंदी योजना नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेतीभोवती तारबंदी करता येणार असून हे अनुदान खालील दिलेल्या चार विभागांमध्ये दिले जात आहे.
- एक ते दोन हेक्टर क्षेत्र असेल तर 90 टक्के
- दोन ते तीन क्षेत्र हेक्टर असेल तर 60 टक्के
- पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
- तर अशा पद्धतीचे हे अनुदान शेतकरी बांधवांना 70 टक्के पर्यंत जास्तीत जास्त मिळणार आहे आणि या तारकुंपन अनुदान योजनेमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
योजनेचा मुख्य उद्देश ?
शेतकरी मित्रांनो तार बंदी अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येते या योजनेसाठी तुम्हाला 90 टक्के अनुदान देण्यात येते. शेतकरी मित्रांनो तार बंदी अनुदान योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जंगली जनावरांपासून तुमच्या पिकांचे जे नुकसान होते ते तुम्ही नुकसान टाळू शकता तुमच्या शेतीला कंपाउंड करून त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?
- सातबारा उतारा
- गाव नमुना ८ अ
- जात प्रमाणपत्र
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
- ग्रामपंचायतीचा दाखला
- समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
