नामवंत कॉलेजमध्ये करा नोकरी, दहावी-बारावी उत्तीर्णांना मोठी संधी
सरकारी आणि खासगी संस्थांमधील आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पुस्तिकेची पीडीएफ अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२२ सत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. हे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
ITI Admission: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे. या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पुस्तिकेची पीडीएफ अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२२ सत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. हे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत
औद्योगिक प्रशिक्षण संस्थागध्ये प्रवेश घेवू इचिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १५ जूनपासून रोज सकाळी वेळेत निःशुल्क मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी उमेदवारांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाणार आहे.
उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज भरतावेळी उमेदवारांनी सुरु असलेला मोबाइल नंबर भरणे अनिवार्य आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रीये उमेवारांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे. प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवरांचे खाते आणि नोंदणीक्रमांक हाच यूजर आयडी म्हणून तयार होईल.
उमेदवाराने आपल्या अकाऊंटमध्ये लॉगिन केल्यावर 'Admission Activity' वर क्लिक करा. त्यानंतर 'Application Form'वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज भरता येणार आहे. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द केले जातील याची नोंद घ्या.
