महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून महत्त्वाची माहिती – e-KYC बाबत चुकीच्या बातम्यांपासून सावधान!

📢 अधिकृत सूचना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या एकात्मिक संगणक प्रणालीद्वारे बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी मंडळाच्या तालुका सुविधा केंद्रांमधून किंवा इतर अधिकृत ठिकाणांहून केली जाते.
नोंदणीकृत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना योजनांच्या पात्रतेनुसार विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मोफत देण्यात येतो.

 चुकीच्या माहितीपासून सावध रहा!

अलीकडे काही YouTube चॅनेलवर बांधकाम कामगारांसाठी e-KYC संदर्भात चुकीच्या माहितीवर आधारित व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत.

महत्त्वाचे स्पष्टीकरण:
👉 उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने e-KYC संदर्भात दिनांक 05.11.2025 किंवा 11.11.2025 रोजी कोणताही शासन निर्णय (GR) जारी केलेला नाही.
👉 तसेच या विषयावर मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा परिपत्रकाद्वारे कोणताही अधिकृत संदेश प्रसिद्ध केलेला नाही.

✅ कामगारांनी काय करावे?

बांधकाम कामगारांनी कोणतीही माहिती अधिकृत स्रोतांवरूनच पडताळून घ्यावी.
अधिकृत माहितीकरिता खालील स्रोत वापरा:

🔗 मंडळाचे संकेतस्थळ: www.mahabocw.in
🏢 नजीकचे तालुका सुविधा केंद्र: तेथे अधिकृत कर्मचारी मार्गदर्शन करतील.

#FactCheck, #महाराष्ट्रकामगारमंडळ, #बांधकामकामगार, #शिष्यवृत्ती, #महाबोसीडब्ल्यू, #eKYC, #MahaBOCWUpdates

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने