SMART Scheme Maharashtra 2025 | Rooftop Solar Subsidy Yojana

 SMART Scheme Maharashtra 2025 | Rooftop Solar Subsidy Yojana


SMART Scheme Maharashtra 2025 | स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर अनुदान योजना | Rooftop Solar Subsidy for Homeowners


🌞 संपूर्ण महाराष्ट्र  रूफटॉप सोलर योजना (Smart Scheme Rooftop Solar Anudan 2025)

 

राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना ऊर्जेत स्वयंपूर्ण बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. या योजनेद्वारे राज्यातील दारिद्र्यरेषेखालील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांना छतावर सोलर सिस्टम बसवण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.


🔆 SMART Scheme म्हणजे काय?


“स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (SMART Scheme)” ही योजना राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे.

या योजनेद्वारे राज्यातील 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांना घराच्या छतावर सौरऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

🎯 SMART Scheme चे उद्दिष्ट


सर्वसामान्य नागरिकांना ऊर्जेत स्वावलंबी बनवणे


सौरऊर्जेचा वापर वाढवणे


स्थानिक रोजगारनिर्मिती व पर्यावरणपूरक ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देणे


विजेचा खर्च कमी करणे आणि दीर्घकालीन बचत साधणे

 

🏠 योजनेचे लक्ष्य 2027 पर्यंत


राज्यात 5 लाख घरगुती ग्राहकांना 2027 पर्यंत छतावरील सौरऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

त्यापैकी:


1.5 लाख लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील (BPL)


3.5 लाख इतर पात्र ग्राहक


 SMART Scheme सोलर अनुदान मर्यादा


⚙️ सोलर सिस्टमची कार्यक्षमता


1 किलोवॅट सोलर सिस्टम दरमहा सुमारे 120 युनिट वीज निर्माण करते.


ग्राहक स्वतःच्या वापरासाठी वीज वापरू शकतात आणि उर्वरित वीज महावितरणला विकू शकतात.


प्रकल्पातून २५ वर्षांपर्यंत वीज निर्मिती होते, ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक बचत मिळते.


🧾 अर्ज व अंमलबजावणी प्रक्रिया


ही योजना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) मार्फत राबविण्यात येणार आहे.

1. महावितरण पात्रता तपासेल


2. घराच्या छताची तपासणी केली जाईल


3. सोलर सिस्टम बसविली जाईल


4. प्रणालीची ५ वर्षे देखभाल व दुरुस्ती पुरवठादाराक

डून केली जाईल

 

📈 SMART Scheme चे फायदे


वीज बिलात मोठी बचत


25 वर्षे टिकणारा सौर प्रकल्प


सरकारी अनुदानामुळे कमी खर्चात सोलर बसविण्याची संधी


स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जा


घरगुती स्तरावर स्वावलंबन


Smart Scheme Maharashtra

Rooftop Solar Subsidy 2025

स्वयंपूर्ण महाराष्ट्र सोलर योजना

PM Suryaghar Yojana Maharashtra

Solar panel subsidy Maharashtra

mahavitaran solar anudan

Rooftop solar Yojana 2025

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने