Cycle Anudan Yojana Maharashtra 2023 गरजु विद्यार्थ्यानसाठी
माहिती संपूर्ण वाचा आवडल्यास आपल्या मित्रांना तसेच गरजु विद्यार्थ्याना शेअर करा
Cycle Anudan Yojana Maharashtra 2023 : राज्य सरकारने ग्रामीण भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या तसेच ज्यांचे घर आणि शाळा यामधील अंतर ५ किमी आहे. अशा ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप योजना आणली आहे. यामध्ये मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल दिली जाणार आहे यासाठी आर्थिक सहाय्य म्हणजेच अनुदान देखील दिले जाईल.
आजही महाराष्ट्रात अनेक दुर्गम भाग आहेत जिथे पक्के रस्ते नाहीत आणि प्रवासाची योग्य सोय नाही, अशात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि शाळेतून घरी परतण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यामुळेच कित्येक मुल शिक्षणापासून वंचित राहतात. तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली येतात, त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या मुलांसाठी सायकल घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. या आणि अशा सर्व बाबींचा विचार करून सरकारने सायकल अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2022 ची वैशिष्ट्ये.
या योजनेमुळे आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या गरजू मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल मिळणार आहे.
त्यांना पायी प्रवास करावा लागणार नाही.
सायकलसाठी कोणावर अवलंबून राहण्याची तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज नाही.
या योजनेतील अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
सायकल वाटप योजनेंतर्गत मिळालेली लाभाची रक्कम लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाईल.
योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक साहाय्याने (अनुदान) मुली स्वत:चे शिक्षण पूर्ण करून सायकल खरेदी करून भविष्यात चांगली नोकरी मिळवू शकतात.
तसेच स्वत:चा स्वयंरोजगार स्थापन करून राज्यातील इतर बेरोजगार नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात.
सदर योजनेतून राज्यातील मुली स्वतंत्र होतील.
सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2022 ची उद्दिष्टे.
महाराष्ट्र या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील गरजू मुलींना घर ते शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलींचे वाटप करणे हा आहे
जेणेकरून मुलींना शिक्षणासाठी मैल पायी चालावे लागू नये.
राज्यातील मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी.
मुलींचा सामाजिक आणि आर्थिक विकास. सायकल वाटप योजनेचे फायदे लाभार्थी मुलींना सायकल वाटप योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून सायकल खरेदी करण्यासाठी रु.5000/- ची आर्थिक मदत दिली जाईल
या योजनेच्या मदतीने मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल
सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2023 ची पात्रता. Cycle vatap yojana.
अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
विद्यार्थी आठवी ते बारावीच्या वर्गात शिकत असावेत
नियम व अटी.
या योजनेचा लाभ इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींनाच घेता येईल.
अर्जदार मुलीची शाळा तिच्या घरापासून ५ किमी किंवा त्याहून अधिक अंतरावर असावी.
सायकल अनुदान योजनेंतर्गत फक्त रु.5000/- ची आर्थिक मदत दिली जाईल आणि सायकल खरेदीसाठी अधिकची लागणारी रक्कम लाभार्थी मुलीला द्यावी लागेल.
महाराष्ट्राबाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
8वी ते 12वी पर्यंतच्या लाभार्थी मुलीला 4 वर्षात सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान दिले जाईल.
गरजू मुलींना सायकल वाटप करताना गाव/वाड्या/तांडे/पाडे येथे राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधान्य दिले जाईल.(डोंगराळ आणि दुर्गम भागात जेथे योग्य रस्ते नाहीत आणि पुरेशा वाहतूक सुविधा उपलब्ध नाहीत.)
सायकल वाटप योजनेंतर्गत फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. (मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.)
सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
शिधापत्रिका (रेशनकार्ड)
निवास प्रमाणपत्र (रहिवासी दाखला)
पासपोर्ट साईझ फोटोज.
मोबाईल नंबर
ई – मेल आयडी
बँक खाते.
विद्यार्थी इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र
सायकल खरेदीची पावती.
सायकल वाटप योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
