प्रत्येक विद्यार्थ्याला 50 हजार रुपये मुख्यमंत्र्यांकडून भेटणार

प्रत्येक विद्यार्थ्याला 50 हजार रुपये मुख्यमंत्र्यांकडून भेटणार

इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना दर वर्षी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार




प्रत्येक विद्यार्थ्याला 50 हजार रुपये मुख्यमंत्र्यांकडून भेटणार


देशात तंत्रशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या वाढावी; तसेच मुलींना शिक्षणासाठी आर्थिक साह्य मिळावे, 




यासाठी इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना दर वर्षी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) प्रगती शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाराष्ट्रासह सर्व राज्यातील विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती गुणवतेच्या आधारावर देण्यात येणार आहे
एआयसीटीई’ने याबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली आहे. डिप्लोमा इन इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाला प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. देशभरातील राज्यांमधील एकूण पाच हजार विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दहावीच्या गुणांच्या आधारावर किंवा प्रवेश घेतानाच्या पात्रता गुणांवर देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थिनींनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे.

या वर्षी दहावी बारावी बोर्ड परीक्षा रद्द होणार.?


या शिष्यवृत्तीसाठी कुटुंबातील एकत्रित उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असावे. अर्ज दाखल केल्यानंतर इन्स्टिट्यूटकडून अर्जांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) अर्जाची पडताळणी करून, शिष्यवृत्ती मिळण्याबाबत कार्यवाही करता येणार आहे. महाराष्ट्रातील ६२४ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येईल. त्याचप्रमाणे ईशान्येकडील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येईल.

शिष्यवृत्तीची अधिक माहिती आणि महत्त्वाच्या तारखांसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आणि ‘एआयसीटीई’ च्या वेबसाइटशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गरजू विद्यार्थिनींना फायदा

आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थिनींकडे शुल्क भरण्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसे नसल्याने त्या डिप्लोमाचे शिक्षण घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे काही विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कोणतेही आर्थिक साह्य मिळत नसल्याने, आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. यामुळे अशा गरजू विद्यार्थिनींसाठी ही शिष्यवृत्ती उपयोगी पडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने