१ली ते १२वी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय बोलतात

 

१ली ते १२वी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय बोलतात



board exam : मागील दोन वर्ष संपूर्ण देश कोरोनाच्या संकटात होता. कोरोनामध्ये सगळ्यात जास्त हाल झाले ते शिक्षणाचे. शिक्षण ऑनलाइन. विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करत होते. काहींपर्यंत या सुविधा पोहचल्या होत्या, काहींपर्यंत सुविधाच पोहचल्या नव्हत्या. काही विद्यार्थ्यांकडे सगळं उपलब्ध असूनही ऑनलाइन समजून घ्यायला अडचणी येत होत्या. अशा अनेक अडचणींमधून कोरोना काळात आपली शिक्षण (Education) व्यवस्था गेली. अडचण समजून घेत शिक्षण विभागानं सुद्धा त्यांच्या परीनं शक्य तितके बदल केले आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला. त्यातला एक प्रयत्न म्हणजे गेल्या दोन वर्षात पहिली ते बारावीच्या परीक्षा या 75 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात आल्या. आता परिस्थिती पूर्ववत होत असताना शिक्षण विभागानं याच निर्णयात बदल केलाय. शैक्षणिक वर्ष 2022- 23 साठी पहिली ते बारावीच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर (100% Syllabus) आधारित होणार असल्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने काल, शुक्रवारी (24 जून) रोजी जारी केलीये.


2022-23 या सत्रापासून सीबीएसई नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आकलन आणि गुणवत्तेवर आधारित असणारे. त्याआधारे मूल्यमापन करण्यात येणार आहे. पुढील सत्राच्या परीक्षांमध्ये गुणवत्तेवर आधारित प्रश्नांची संख्या 10 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. सत्र 2021-22 मध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेत 50 टक्के वैकल्पिक प्रश्न विचारण्यात आले होते, जे सत्र 2022-23 साठी 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. पुढील सत्रापासून नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षाही या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नवर आधारित असतील. मात्र, अंतर्गत मूल्यांकनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने