मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना /मागेल त्यला solarpump 2025 महाराष्ट्र
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र: राज्यातील शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी, शाश्वत व्हावी तसेच राज्यातील शेतकरी संपन्न आणि सुखी व्हावा असे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे, यासाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना, धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवीत असते, याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र या सारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या योजनांची अंमलबजावणी करत आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे, सौर उर्जा हा उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे, भारतासारख्या देशामध्ये आठ महिने कडक उन असते, त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर उर्जेच्या स्त्रोताचा वापर सौर कृषी पंपच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.
त्याचप्रमाणे पारंपारिक उर्जेचे स्त्रोत निसर्गामध्ये अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत, तसेच त्यांचा अत्यंत वापर झाल्यामुळे निसर्गामध्ये असमतोल निर्माण झाला आहे, शेतीसाठी पाण्याचे अत्यंत महत्व आहे आणि ते मिळवण्यासाठी विजेची गरज असते, हि वीज जर अपारंपरिक उर्जा स्त्रोतातून म्हणजे सौर उर्जेतून मिळविण्यात आली तर हे शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे आहे, तसेच यामुळे निसर्गाचा समतोल सुद्धा साधल्या जाईल. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र विषयी संपूर्ण माहिती जसे या योजनेच्या अंतर्गत अनुदान किती मिळणार, त्यासाठी पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्र इत्यादी माहिती पाहणार आहोत
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र वैशिष्ट्ये
महाराष्ट्र राज्यात अटल सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाव्दारे राज्यात एक लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतूद व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थ्यांकरिता विशेषघटक योजना / आदिवासी उपयोजनांतर्गत निधीचा वापर करून नवीन सौर कृषी पंप योजना करण्यास मान्यता दिली आहे. शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे त्याचप्रमाणे राज्य शासनाची पारंपरिक पद्धतीने कृषिपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात आणि राज्य शासनाव्दारे सबसिडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचत करण्याचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी एक लाख सौर कृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र हि संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाची योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत पुढील तीन वर्षाच्या कालावधीत टप्प्या टप्प्याने एक लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्याचा शासनाचा उद्देश आहे. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 25000 सौर कृषी पंप, दुसऱ्या टप्प्यात 50000 सौर कृषी पंप आणि तिसऱ्या टप्प्यात 25000 सौर कृषी पंप आस्थापित करण्याचे उद्देष्ट ठरले आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून अठरा महिन्यात राबविण्यात येईल.
- मुख्यमंत्री मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 95 टक्के अनुदान देणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के रक्कम भरावयाची आहे.
- या योजने अंतर्गत 5 एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 3 HP पंप देण्यात येतील आणि 5 एकर पेक्षा अधिक शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP आणि 7.5 HP पंप देण्यात येतील.
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र या योजनेचं अंतर्गत राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 Highlights
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र |
|---|---|
| व्दारा सुरुवात | महाराष्ट्र शासन |
| राज्य | महाराष्ट्र |
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्याचे शेतकरी |
| उद्देश्य | राज्याच्या शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून देणे |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
| अधिकृत वेबसाईट | https://www mahadiscom.in/solar |
| विभाग | MSEDCL |
महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र: उद्दिष्ट
राज्याच्या अनेक भागातील शेतकरी आजही शेती सिंचनासाठी डिझेल पंप किंवा इलेक्ट्रिक पंप वापरतात, यामध्ये दुर्गम भागातील शेतकरी डिझेल पंप उपयोगात आणतात, डिझेल पंप महाग असतात तसेच डिझेलचे भाव सुद्धा वाढत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी बराच खर्च करावा लागतो या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते, शेतकऱ्यांना या नुकसानापासून वाचविण्यासाठी त्यांचा शेती सिंचनाचा प्रश्न मिटवणे त्याचबरोबर पर्यावरणाचे सुद्धा संरक्षण करणे हा उद्देश ठेऊन शासनाने हि योजना सुरु केली आहे.
महाराष्ट्र राज्यात हि योजना राबवीत असतांना विशेषतः विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तसेच अतिदुर्गम भागांमधील शेतकऱ्यांसाठी राबविली जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांनी भरावयाचा हिस्सा कमीत कमी ठेऊन उर्वरित रक्कम वित्तीय संस्थेमार्फत कर्ज स्वरुपात देण्यात येईल आणि या कर्जाची परतफेड महावितरण कंपनीव्दारे टप्प्या टप्प्याने करण्यात येईल. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा हिस्सा सर्वसाधारण लाभार्थ्यांकारिता सौर कृषी पंपांच्या केंद्रीय आधारभूत किंमतीच्या 10 टक्के आणि अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा राहील.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत वर्गवार लाभार्थ्यांचा हिस्सा
| लाभार्थी | 3 HP पंप लाभार्थी हिस्सा | 5 HP पंप लाभार्थी हिस्सा | 7.5 HP पंप लाभार्थी हिस्सा |
|---|---|---|---|
| सर्वसाधारण लाभार्थी | 16,560/- रुपये (10 %) | 24,710/- रुपये (10%) | 33,455/- रुपये (10%) |
| अनुसूचित जाती | 8,280/- रुपये (5%) | 12,355/- रुपये (5%) | 16,728/- रुपये (5%) |
| अनुसूचित जमाती | 8,280/- रुपये (5%) | 12,355/- रुपये (5%) | 16,728/- रुपये (5%) |
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र लाभ
महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोलाची योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र सुरु केली आहे, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कमीत कमी दारात सौर कृषीपंप शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभ खालीलप्रमाणे आहेत.
- मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे, या योजनेच्या अंतर्गत विद्युत कृषीपंपांच्या जागेवर सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- योजने अंतर्गत शासनाकडून सौर कृषी पंपांवर सबसिडी देण्यात येणार आहे, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 95 टक्के सबसिडी देणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के रक्कम भरावयाची आहे.
- या योजनेमुळे सौर कृषी पंपांमुळे पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे
- योजने अंतर्गत पाच एकर पर्यंत शेत जमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तीन HP पंप देण्यात येईल आणि त्यापेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच HP पंप देण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून 25 हजार सौर कृषिपंपांचे वितरण करण्यात येणार आहे, आणि दुसऱ्या टप्प्यात 50 हजार सौर कृषीपंपांचे वितरण केले जाईल आणि तिसऱ्या टप्प्यात शासनाकडून शेतकऱ्यांना 25 हजार सौर कृषीपंपांचे वितरण करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील ज्या
शेतकऱ्यांकडे आधीच विद्युत कनेक्शन आहे, त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सौर उर्जेवर चालणारे AG पंपांची सुविधा दिली जाणार नाही. - हि योजना ऑनलाइन असल्यामुळे अर्जदार या योजनेमध्ये अर्ज कधीह आणि कोठूनही करू शकतात, त्यामुळे योजनेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यामुळे अर्जदाराचा वेळ वाचेल.
- या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे जुने डिझेल पंप बदलून त्याजागी नवे सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहे त्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संरक्षण होईल, तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेमुळे विद्युत विभागावरचा वीज वितरणाचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल.
- मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमुळे शासनाकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या वीज अनुदानाचा शासनावरचा बोजाही कमी होण्यास मदत होईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल पर्यायी शेतकरी संपन्न होईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र लाभार्थी पात्रता
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र मोठ्याप्रमाणात राबविण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी शासनाने लाभार्थ्यांसाठी पात्रता निकष ठरवून दिलेले आहे, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे पात्रता निकष माहित असणे आवश्यक आहे, या योजनेचे पात्रता निकष खालीलप्रमाणे असतील.
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील, परंतु या शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसणे आवशयक आहे.
- या योजने अंतर्गत पाच एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन HP सौर कृषी पंप आणि पाच एकरांपेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच HP सौर कृषी पंप देण्यात येतील.
- या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसलेले शेतकरी तसेच विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत कनेक्शन मिळणे शक्य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राहील.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारी शेतजमीन असणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील.
- योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंपांसाठी सर्वसाधारण गटांच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के आणि अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5 टक्के याप्रकारे लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे आवश्यक असेल.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना 3 HP आणि 5 HP सोलर पंपांसाठी लाभार्थी पात्रता
- शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- पारंपारिक पद्धतीने कृषि पंपांकरिता विद्युत जोडणी न झालेले शेतकरी.
- पाच एकरापर्यंत शेतजमीन धारकास 3 HP सौर कृषीपंप व 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 5 HP आणि 7.5 HP सौर कृषिपंप देय राहील.
- यापूर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेव्दारे कृषी पंपांचा लाभ न घेतलेले शेतकरी
- अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्रधान्य.
- वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
- धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
- महावितरणाकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरून प्रलंबित असलेले शेतकरी अर्जदार.
- शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- पारंपारिक पद्धतीने कृषि पंपांकरिता विद्युत जोडणी न झालेले शेतकरी.
- पाच एकरापर्यंत शेतजमीन धारकास 3 HP सौर कृषीपंप व 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 5 HP आणि 7.5 HP सौर कृषिपंप देय राहील.
- यापूर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेव्दारे कृषी पंपांचा लाभ न घेतलेले शेतकरी
- अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्रधान्य.
- वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
- धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
- महावितरणाकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरून प्रलंबित असलेले शेतकरी अर्जदार.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना 7.5 HP सोलर पंपांसाठी लाभार्थी पात्रता
- विहीर किंवा कुपनलिका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषित, आणि अंशतः शोषित गावांमधील विहिरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन सौर कृषीपंप अनुज्ञेय असणार नाही.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपसाची स्थिती 60 टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.
- खडकाळ क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या बोरवेल विहिरी हे सिंचनाचे शाश्वत साधन नसल्याने बोरवेल विहिरींमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही. परंतु गाळाच्या क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या कुपनलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षित क्षेत्रांमध्ये कूपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.
- कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रांमध्ये 60 मीटर पेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यात येणार नाही.
- विहीर किंवा कुपनलिका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषित, आणि अंशतः शोषित गावांमधील विहिरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन सौर कृषीपंप अनुज्ञेय असणार नाही.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपसाची स्थिती 60 टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.
- खडकाळ क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या बोरवेल विहिरी हे सिंचनाचे शाश्वत साधन नसल्याने बोरवेल विहिरींमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही. परंतु गाळाच्या क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या कुपनलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षित क्षेत्रांमध्ये कूपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.
- कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रांमध्ये 60 मीटर पेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यात येणार नाही.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र आवश्यक कागदपत्र
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे राहील.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- शेतीचे कागदपत्र
- मूळ निवासाचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ओळख पत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- 7 / 12 उतारा
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे राहील.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- शेतीचे कागदपत्र
- मूळ निवासाचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- ओळख पत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- 7 / 12 उतारा