शीर्षक नाही

 स्वाधार योजना 2024: भारत देश हा एक विकासशील देश आहे, त्यामुळे देशामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये विकास होत आहे, औद्योगिक क्षेत्रात मोठया प्रमाणात विकास होत आहे, तसेच या औद्योगिक क्षेत्रांमध्ये विकासाप्रमाणे कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे, त्यामुळे औद्योगिक क्षेत्रांबरोबर शिक्षण शेत्रात सुद्धा मोठयाप्रमाणात विकास होत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी व्यावसायिक/बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत आहे, तसेच या महाविद्यालयांमध्ये व्यवसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा संख्या वाढत आहे, या विद्यार्थ्यांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी असतात जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडतात.

अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बहुतांश वेळा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, या सर्व विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी हि, स्वाधार योजना 2024 सुरु केली आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधित पूर्ण करता यावे. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण महाराष्ट्र स्वाधार योजना, या योजने संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसेकी योजनेसाठी लागणारी पात्रता, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, लाभ आणि अर्ज करण्याची पद्धत इत्यादी माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत मिळणारे लाभ

स्वाधार योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी, 12वी पदवी, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निवासाची सोय आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे अनुदानाची रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. 


मिळणारा भत्तामुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या सारख्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कमइतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित ”क” वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कमउर्वरित क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम
भोजन भत्ता32,000/- रुपये28,000/- रुपये25,000/- रुपये
निवास भत्ता20,000/- रुपये15,000/- रुपये12,000/- रुपये
निर्वाह भत्ता8,000/- रुपये8,000/- रुपये6,000/- रुपये
असा एकूण भत्ता60,000/- रुपये51,000/- रुपये43,000/- रुपये

स्वाधार योजना 2024 मराठी उद्देश (Objectives)

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही, तसेच या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करतांना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना समोर जावे लागते, त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा होतकरू आणि गुणवंत अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, तसेच त्यांना त्यांचे उज्ज्वल  भविष्य निर्माण करता यावे, यासाठी अशा विद्यार्थ्यांना भोजन आणि निवासाची सोय व इतर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरुपात या विद्यार्थ्यांची आर्थिक सहायता केली जाते.

                 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

स्वाधार योजना 2024 लाभार्थी पात्रता

महाराष्ट्र राज्यातील ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजने अंतर्गत लाभ मिळवायचा आहे त्यांना या योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे, या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थी पात्रता निकष खालीलप्रमाणे राहील.

  • या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
  • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा शेड्यूल बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी स्वतःचा आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक असेल.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वर्षी एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
  • या योजने अंतर्गत विद्यार्थी स्थानिक नसावा, म्हणजे विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.
  • स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थी इयत्ता 11वी किंवा 12वी आणि त्यानंतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
  • स्वाधार योजनेमध्ये इयत्ता 11वी आणि 12वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी मध्ये किमान 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPA चे गुण असणे आवश्यक आहे. स्वाधार योजनेच्या अंतर्गत इयत्ता 12वी नंतर पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा त्याचप्रमाणे पदवीनंतर पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
  • स्वाधार योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद, वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद किंवा तत्सम सक्षम प्रधीकारी यांच्या मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.

महाराष्ट्र स्वाधार योजना अटी आणि निकष

स्वाधार योजना 2024, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे अर्ज सादर करावा लागेल, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हे या अर्जांची छाननी करतील व अर्जांची गुणवत्ता यादी जिल्ह्यानुसार करून पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश घेतलेल्या जिल्ह्यातील जवळच्या मागासवर्गीय वस्तीगृहाशी संलग्न करतील. सामाजिक न्याय विभागाने ठरवून दिलेल्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करवा लागेल.  

  • या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल, तसेच निवड झालेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत योजनेच्या लाभास पात्र असेल.
  • स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल, या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी मर्यादा 50 टक्के इतकी राहील.
  • स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत निकाल लागल्यापासून पंधरा दिवसच्या आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. 

    स्वाधार योजना 2024 लाभ वितरण प्रक्रिया

    • महाराष्ट्र स्वाधार योजना 2024 या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे अशा गरीब अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांच्या विद्यार्थी मुलांना देण्यात येणार आहे.
    • विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश देण्यात आला आहे, त्या वसतिगृहाचे गृहपाल विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, त्या संबंधित महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याच्या उपस्थितीचा अहवाल प्राप्त करून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना सादर करतील आणि संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हे स्वाधार योजनेतील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक तिमाही उपस्थितीच्या आधारे अनुदानाची रक्कम त्या विद्यार्थ्याचा बँक खात्यामध्ये DBT पोर्टल मार्फत जमा करतील. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणे आवश्यक आहे.
    • स्वाधार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना योजनेच्या अनुदानाची रक्कम DBT पोर्टल मार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.
    • विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमांना महाविद्यालयात प्रवेश मिळविल्यानंतर या योजनेंतर्गत देय होणाऱ्या रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल.
    • स्वाधार योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्याची रक्कम वजावट करून उर्वरित रक्कम निर्वाह भत्ता म्हणून देण्यात येईल.
    • या योजनेच्या अंतर्गत जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असतील, त्या विद्यार्थ्यांना या योजनेतील निर्वाह भत्याचा लाभ मिळणार नाही.
    • या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक आहे, या बाबत संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून प्रत्येक तिमाही उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने