असे कामवा लाखो रूपये दुध उत्पादक शेतकऱ्यांनी.
असे करा नियोजन
Dhudh utpadak shetakari, dughgdh vyavsay
असे करा नियोजन
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील विठ्ठल शिरसाट या तीस वर्षे वयाच्या तरुणाने आपल्या सात एकर शेतीला पुन्हा म्हशींवर आधारित दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे. गोठ्यात मजूर तैनात न करता विठ्ठल व त्याचे आई- वडील असे तिघेच गोठ्यात राबतात. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जिद्दीतून प्रगती करीत शेतीतील उत्पन्नाला आर्थिक आधार देण्यासह समाधान व स्थैर्य मिळविण्यात हे कुटुंब यशस्वी ठरले आहे.
लीकडील काही वर्षांत कुडाळ तालुक्यात अ असलेले निवजे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पटलावर चर्चेत आले आहे. शेती, बाबू लागवड, दुग्ध, कुक्कुटपालन, बायोगॅस अशा विविध व्यवसायांमधून गावाचा आर्थिक स्तर उंचावला आहे. माणगावहून बारा किलोमीटरवर डोंगरदऱ्यात वसलेल्या या गावाचा भात उत्पादनातील उत्कृष्ट गाव म्हणून परिचय होता. अलीकडील वर्षांत गावाने दुग्ध व्यवसायात आघाडी घेतली आहे. येथील अनेक कुटुंबे या व्यवसायात सक्रिय आहेत. खरिपात भात, नाचणी तर उन्हाळ्यात चवळी, मूग, कुळीथ, उडीद अशी पिके येथील शेतकरी घेतात.
दुग्ध व्यवसायात तरुणांचा रस
गावातील तरुणाईने नोकरी, व्यवसायांपेक्षा शेतीत अधिक रस घेतला आहे. गावातील तीस वर्षे वयाचे विठ्ठल शिरसाट हे त्यापैकी एक. त्यांची सात एकर शेती असून त्यात काजू सुमारे दोन एकर असून, बांबूची ८० झाडे आहेत. दोन एकरांत भातशेती व कसायला घेतलेल्या क्षेत्रातही ते भात घेतात. उन्हाळ्यात गवंडी काम करून विठ्ठल शेतीतील उत्पन्नाला हातभार लावायचे. लहानपणापासून शेतीकामे करीतच बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. काही परीक्षा दिल्या. परंतु यश आले नाही. नोकरी मिळाली नाही म्हणून ते खचून गेले नाही. शेतीतूनच प्रगती करायची जिद्दी बाळगली.
स्थानिक जातीच्या तीन म्हशी खरेदी केल्या.
त्या वेळी या व्यवसायातील कोणता अनुभव गाठीशी नव्हता. मात्र अतिशय उत्तम पद्धतीने देखभाल करीत उत्पन्न जोडण्यास सुरुवात केली. शेती सांभाळण्यासोबत गोठ्यातील शेण काढणे, चारा कापणे, दूध विक्री करणे अशी सर्व कामे विठ्ठल स्वतः करायचे. त्यामुळे परिसरातील काहींनी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. काहींनी हा व्यवसाय झेपण्यावरून चेष्टा देखील केली.
अंगीकारला व्यावसायिक दृष्टिकोन
पारंपरिक दुग्ध व्यवसायातून दूध उत्पादनाल मर्यादा येत होत्या. नफ्याचे प्रमाण नगण्य होते.
देखभाल, व्यवस्थापनावरील खर्च आणि उत्पादन यांचे गणित जुळत नव्हते. दरम्यान कोल्हापूर येथील गोकूळ संघाच्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाने व्यावसायिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून गोठा व्यवस्थापन करण्याला चालना मिळाली. भगीरथ प्रतिष्ठानने प्रोत्साहित केले. जिल्हा बँकेकडून कर्ज मिळाले. त्यातून म्हशी घेण्यासाठी मदत झाली. हरियानातून मुऱ्हा म्हशी आणण्याचे निश्चित केले. तत्पूर्वी कोल्हापूर भागातील काही यशस्वी दुग्धोत्पादकांचे गोठे अभ्यासले. प्रति सुमारे एक लाख ते एक लाख २० रुपये या दराने म्हशी घेतल्या आहेत. त्यांना काही तास मुक्त फिरता यावे.
Dhudh utpadak shetakari, dughgdh vyavsay
यासाठी वीस हजार खर्चुन ३२ बाय २८ फूट क्षेत्रफळाचा काहीसा मुक्तसंचार गोठा बांधला आहे. बारमाही पाण्याची उपलब्धता असावी याकरिता विहीर बांधणी देखील केली आहे. कडबा कुट्टी व दूध काढण्याचे यंत्र घेतले आहे. हिरव्या चाऱ्याची सोय म्हणून दोन एकरांत चारा पीक लागवड केली आहे. गोठ्यात सुमारे आठ मुऱ्हा म्हशी आहेत. पैकी सध्या चार दुभत्या आहेत.
फायदेशीर अर्थकारण ,किती होऊ शकतो फायदा
प्रति दिन म्हैस १२ ते १५ लिटर दूध देते. तर प्रति दिन ५० ते ६० लिटर रोजचे दूध उत्पादन होते. वर्षभराचा विचार केल्यास रोजच्या किमान दूध संकलनाचा आकडा ३० लिटरपेक्षा खाली जात नाही. गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत श्री. निवजेश्वर डेअरी फार्मची स्थापना केली आहे. त्यामार्फत दूध खरेदी होऊन हे दूध गोकूळ महासंघाला पुरवले जाते. विठ्ठल यांना दुधासाठी प्रति लिटर ६० ते ६२ रुपये दर मिळतो. खर्च वजा जाता ४० ते ५० टक्के नफा मिळतो. श्यामराव पेजे महामंडळाकडूनही अर्थसाह्य घेतले असून, व्याज परताव्यापोटी दरमहा पाच हजार रुपये मिळतात. व्यवसायातील सातत्य, सचोटी आणि प्रामाणिकपणा यामुळे निवजेश्वर संस्थेकडून या वर्षी दिवाळीला विठ्ठल यांना २५ हजार रुपये बोनस देण्यात आला. भात, आंबा-काजू व बांबू लागवडीतून वर्षाला जे उत्पन्न मिळते त्यास दुग्ध व्यवसायाचा मोठा आर्थिक आधार झाल्याचे विठ्ठल सांगतात. विठ्ठल, आई सत्यवती व वडील दिगंबर असे तिघेच गोठ्यात राबतात. कोणताही मजूर कामासाठी तैनात केलेला नाही. त्यामुळे त्यावरील मोठ्या खर्चात बचत केली आहे. याच व्यवसायातून विहीर व घराचे काही बांधकाम करता आले आहे.
Dhudh utpadak shetakari, dughgdh vyavsay
